अमेरिका – वर्जिनिया येथे अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 11 जण जागीच ठार झाले आहेत. तर आत्तापर्यंत 6 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. ही भयानक घटना शहराच्या मध्यभागी शुक्रवारी रात्री घडली आहे.
At least 11 people were killed while six others sustained injuries after a gunman opened fire at a municipal centre in the US city of Virginia Beach
Read @ANI Story | https://t.co/F8hqgFm1cG pic.twitter.com/cWpsOKjlBT
— ANI Digital (@ani_digital) June 1, 2019
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, वर्जिनिया येथील सरकारी इमारतीत हा गोळीबार झालेला आहे. गोळीबार करणारा माथेफिरू वर्जिनिया येथील म्युनिसिपल सेंटरचा कर्मचारी आहे. त्याने केलेल्या गोळीबारात एक पोलीसदेखील जखमी झाला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.