पुणे – जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या लोकसभेच्या चार जागांसाठीच्या मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. या मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे पुण्यात दाखल झाले आहे.
मतमोजणीची रंगीत तालीम झाली आहे. यामुळे प्रत्यक्ष मतमोजणीवेळी अधिकारी -कर्मचारी यांच्या मनात कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही. मतमोजणीच्या एका टेबलावर एकूण तीन कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर यावर देखरेख ठेवण्यासाठी एका सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. चारही मतदारसंघात मिळून एकूण सुमारे चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेवर केंद्रीय निवडणूक निरीक्षक लक्ष ठेवणार आहे. फेरीनिहाय मतांची माहिती आयोगाला पाठविण्यात येणार आहे.