काश्‍मीरमधील स्फोटात जवान शहीद, सात जखमी

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ आयईडीद्वारे स्फोट घडवण्यात आला असून यात एक जवान शहीद झाला आहे. या स्फोटात सात जवान जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट पूँछ जिल्ह्यातील मेंढर सेक्‍टर येथे घडला.

मेंढर येथे सीमारेषेजवळ बुधवारी दुपारी आयईडीद्वारे स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकातील आठ जवान जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सात जवान जखमी झाले आहेत.

दरम्यान, बुधवारी सकाळी कुलगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू- काश्‍मीरमधील कुलगाम येथे बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कुलगाममधील गोपालपुरा येथे सुरक्षा दलांच्या शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळी अजूनही शोधमोहीम राबवली जात आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.