पिंपरी – पत्नीलाच जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या पती व इतर तीन जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला घालून पाडून बोलून जातिवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार जुनी सांगवी येथे घडली.
फिर्यादी यांचा पती सचिन बाळकृष्ण खोल्लम रा. जयमाला नगर, जुनी सांगवी, नणंद सोनाली बेदरकर, तिचे पती सुनिल बेदरकर (दोघे रा. नवी सांगवी), उज्वला विनायक निघोजकर (रा.रांजणगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा पती सचिन तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला शिवीगाळ व मारहाण करीत होता. तसेच तिला खालच्या जातीची आहेस, असे बोलून जातिवाचक शिवीगाळ करुन शारीरिक व मानसिक छळ करत होता.