भटिंडा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधील भटिंडा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सॅम पित्रोदा यांनी काही दिवसांपूर्वी १९८४ साली झालेल्या शीख दंगलींबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. शीख दंगलीविषयी एका प्रश्नाला उत्तर देताना पित्रोदा यांनी, “हुआ तो हुआ.”अशी प्रतिक्रिया दिली होती. पित्रोदांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांच्यावर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी निशाणा साधला होता. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणी पित्रोदांची कानउघाडणी करताना पित्रोदांचं वक्तव्य लाजिरवाणं असल्याचं म्हंटलं होतं.
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या पित्रोदांची कानउघाडणी करणाऱ्या प्रतिक्रियेवर टिप्पणी करताना, “राहुल गांधी तुम्ही तुमच्या गुरूंना का रागावता? तुमचे गुरु तर तेच बोलले आहेत जे काँग्रेसच्या अनेक वर्षांपासून हृदयात आहे.” असा टोला लगावला.
#WATCH PM in Bathinda, Punjab on R Gandhi's remark 'I told him(Sam Pitroda) he should be ashamed (for comment on 1984 riots)': 'Naamdaar', you pretended to scold your mentor for what? Because he publicly said what had always been in Congress' heart? It's you who should be ashamed pic.twitter.com/IH0kWqCmYj
— ANI (@ANI) May 13, 2019