पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरिज स्पर्धा
पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील तिस-या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत जय शहा, तेज ओक, पार्थ काळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली. (सेंटर फॉर पोलीस रिसर्च) सीपीआर, पाषाण येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित जय शहाने वेदांग काळेचा 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. तेज ओकने अथर्व जोशीचा 6-1 असा पराभव केला. राघव सरोदेने कपिल गढीयारला 6-3 असे पराभूत केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
दुसरी फेरी : 12 वर्षाखालील मुले : जय शहा(1)वि.वि.वेदांग काळे 6-3, तेज ओक वि.वि.अथर्व जोशी 6-1, नीव कोठारी वि.वि.श्रीराम जोशी 6-0, पार्थ काळे(13)वि.वि.वेदांग बानी 6-1, शार्दूल खवळे वि.वि.क्रिशांक जोशी 6-1, राघव सरोदे वि.वि.कपिल गढीयार 6-3, अमोघ दामले(7)वि.वि.अमेय नेरकर 6-0.
14 वर्षाखालील मुली : दुसरी फेरी – सिद्धी खोत(1)वि.वि.तेजस्विनी श्रीफुले 6-4, प्रिशा शिंदे वि.वि.आहाना अट्टावार 6-2, समृद्धी भोसले(2)वि.वि. डेलिशा रामघट्टा 6-2.