बॉलीवूडमधील अभिनेता अजय देवगण, तब्बू आणि रकुल प्रीत यांची प्रमुख भूमिका असलेला “दे दे प्यार दे’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. नुकतेच तब्बू आणि अजयच्या जोडीमुळे चांगलाच चर्चेत असलेल्या या चित्रपटातील नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे “मुखडा वेख के…’ असे शीर्षक आहे.
या गाण्यात चित्रपटाची स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यासोबतच रकुल, अजय आणि तब्बू यांची केमिस्ट्रीची झळक दिसून येत आहे. या गाण्याला मिका सिंग आणि धवानी विनोद यांनी आवाज दिला असून टी सीरिज आणि लव्ह फिल्मस् यांची निर्मिती आहे.
प्रेक्षकांनाही चित्रपटातील हे गाणे थिरकायला भाग पाडणारे आहे. अजय भूषण कुमार, किशन कुमार आणि लव रंजन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात आशिष नावाच्या 50 वर्षांच्या व्यक्तीचे पात्र साकारत आहे. तर रकुल आयशा नावाचे 26 वर्षाच्या तरूणीचे पात्र साकारत आहे. जी आशिषची गर्लफ्रेंड आहे. तर तब्बू अजयच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 17 तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.