माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने आपल्या अभिनय आणि सुंदरतेच्या मदतीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या चेह-याशी मिळता-जुळता चेहरा असणरी अभिनेत्रीने प्रसिद्धी मिळविली होती. त्यानंतर आता आणखी एक चेहरा समोर आला आहे, जो ऐश्वर्याशी मिळता-जुळता आहे.
इराणी मॉडल महालघा झबेरीचे काही फोटो सोशल साइट्सवर खूपच व्हायरल झाले होते. या मॉडलचा चेहरा ब-यापैकी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसारखा दिसतो. तसेच महालघाला जगातील सर्वात सुंदर महिला पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे.
महालघा ही फेमस मॉडल आहे. तिचा जन्म इराणमध्ये झाला असून सध्या ती अमेरिकात राहते. अनेक मॅगझीनच्या कव्हर पेजवर तिचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ती सोशल साइट्सवर सतत चर्चेत असते. तिला फॉलोइंग करणा-यांचीही संख्या लाखात आहे.
दरम्यान, ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ती नुकतीच “फन्ने खां’मध्ये राजकुमार रावसोबत झळकली होती. तसेच ती कान्स चित्रपट सोहळयातही सहभागी झाली होती.