ठाणे – ठाण्यातील एका सोसायटीचा सेफ्टी टॅंक स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ढोकाळी नाका परिसरातील प्राईड प्रेसिडेन्सी लुक्सिरिया सोसायटीच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे.
ठाण्यातील ढोकळी नाका येथील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया सोसायटीचा सिव्हरेज सेफ्टी टँक साफ करण्यासाठी एकूण ११ कामगार सफाई करण्यासाठी पाण्याच्या टाकीत उतरले होते. दरम्यान, टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. अमित पहाल, अमन बादल, अजय बुंबक अशी मृत कामगारांची नावं आहे. तर आठ कामगारांना जवळच्याच मेट्रो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या या कामगारांची प्रकृती गंभीर असून, हे कामगार मीरा रोड परिसरातील रहिवासी आहेत.
Thane West: 8 people got stuck in a 130 cubic meter deep Sewage Treatment Plant at Pride Presidency Luxuria in Dhokali around 12:25 am today. 3 of them died in the incident, rest 5 were rescued. Bodies handed over to police. #Maharashtra pic.twitter.com/XqzFGKw3cb
— ANI (@ANI) May 10, 2019