पुणे – सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत एसपीजे ग्रुप, वाईन इंटरप्रायझेस, टीसीएस व अर्न्स्ट अँड यंग या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्यपुर्व फेरीत मंदार भंडारीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर एसपीजे ग्रुप संघाने एलटीआय संघाचा 86 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पहिल्यांदा खेळताना एसपीजे ग्रुप संघाने 20 षटकात 2 बाद 202 धावांचा डोंगर रचला. मंदार भंडारीने केवळ 59 चेंडूत नाबाद 118 धावांची दमदार खेळी केली. 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राज मोहिते, संजय जोशी, समिर सिंग व सागर मगर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे एलटीआय संघाचा डाव 20 षटकात 9 बाद 116 धावांत अटोपला. मंदार भंडारी सामनावीर ठरला.
नविन कटारीयाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावार वाईन इंटरप्रायझेस संघाने ऍमडॉक्स संघाचा 3 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.