यंदा ‘नीट’चा कटऑफ वाढण्याची शक्‍यता

पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी रविवारी (दि.5) घेण्यात आलेली नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात “नीट’ परीक्षा तुलनेने सोपी गेल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावर्षी “नीट’चा कटऑफ वाढण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत रविवारी देशभरात “नीट’ परीक्षा घेण्यात आली. सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण 720 गुणांच्या या परीक्षेसाठी तीन तासांचा कालावधी होता. दुपारी 2 ते 5 यावेळेत ही परीक्षा झाली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवशास्त्राचे प्रश्न बऱ्यापैकी सोपे होते. त्यामुळे अनेकांनी सर्वच उत्तरे लिहिली आहेत. त्यातुलनेत रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न किचिंतसी कठीण होती. मात्र, गतवर्षीच्या परीक्षेच्या तुलनेत काठीण्य पातळी कमी होती. भौतिकशास्त्र विषयातील काही प्रश्‍नांना वेळ कमी पडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

“डीपर’ संस्थेचे हरीश बुटले म्हणाले, “विद्यार्थ्यांना “नीट’ यावेळी सोपी गेल्याचे दिसून येत आहे. भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न आधीच्या परीक्षेप्रमाणेच काहीसे कठीण होते. तुलनेने जीवशास्त्र विषयात विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळतील.’

सायन्स ऍकॅडमीचे दिलीप शहा म्हणाले, “जीवशास्त्र विषयातील एक-दोन प्रश्नच अभ्यासक्रमाबाहेरचे होते. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांसाठी काहीसा वेळ कमी पडला. तसेच अनेक प्रश्‍न “एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमातील असल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना “नीट’ अधिक सोपी गेल्याचे दिसून येत आहे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.