Babil Khan Instagram Post| अभिनेते इरफान खान यांनी बॉलीवूडसह हॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र चार वर्षांपूर्वी 2020 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान याने वडिलांच्या आठवणीत इनस्टाग्रामवर एक भावुक स्टोरी शेअर केली आहे.
बाबिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. “कधी कधी वाटतं की हार मानून वडिलांकडे जावं”, असं बाबिलने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर अनेकांनी त्याच्या बद्दल चिंता व्यक्त केली. यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली आहे. काही दिवसांपू्र्वीच बाबिल इरफान खानच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याने आई सुतापा सिकदर आणि इरफान यांचा फोटो शेअर करत तुमची आठवण येत असल्याचे म्हंटले होते. Babil Khan Instagram Post|
दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान यानेही फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाबिल खानने आपल्या अभिनयासोबतच आपल्या वागण्यानेही चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. बाबिल खान याने ‘काला’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. काला चित्रपटानंतर बाबिल खान ‘द रेल्वे मॅन’ या वेबसिरीजमध्ये केके मेनन, आर माधवन आणि दिव्येंदूसोबत दिसला होता. रबाबील खान लवकरच शुजित सरकारच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. Babil Khan Instagram Post|
हेही वाचा:
YouTuber मनीष कश्यप आज भाजपमध्ये प्रवेश करणार ; निवडणूक लढवणार नाही, पण…