Rain Alert । राज्यासह देशात आठवड्याभरात अवकाळी पावसाने सर्वत्र गोंधळ घातलाय. दरम्यान, आता पुन्हा येत्या 24 तासात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. गेल्या आठवड्याभरात पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, आता या आठवड्याच्या शेवटी पावसाची हजेरी लागणार आहे. पुढील चार दिवस राज्याच पावसाची शक्यता कायम असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट Rain Alert ।
राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
राज्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मराठवाड्यातील लातूर आणि परभणीत अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. तर विदर्भातील अकोल्यातही अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. भंडारा, बुलढाणा, अमरावतीमध्येही विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. अवकाळी पावसामुळे रब्बी, ज्वारी, कांदा यासह फळबागांचं मोठं नुकसान झालं.
अवकाळीमुळे शेती, फळबागांचं नुकसान Rain Alert ।
अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील मळसुर भागात गारपीटीसह जोरदार पाऊस. गारपीट आणि पावसामुळे आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह झालेली गारपीट आणि पाऊस यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. नागपूरसह वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिमसाठी नागपूर प्रादेशिक हवामान कार्यालयाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. गेल्या दोन-तीन दिवसात नागपूरसह बुलढाणा अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्याना अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने झोडपून काढलंय.
उष्णतेपासून मिळणार दिलासा
उष्णतेच्या लाटेनंतर आता दिल्लीकरांना दिलासा मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, पुढील तीन दिवस राजधानी दिल्लीत ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानात सहा अंशांपर्यंत घसरण होऊ शकते. रविवारी तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.