Nashik Lok Sabha । महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा काही केल्या सुटत नाही. त्यातच नाशिक लोकसभा मतदारसंघाचा पेच अजूनही कायम आहे. शिंदे गट आणिअजित पवार गटाकडून या जागेसाठी स्पर्धा सुरु आहे. या जागेची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना मिळणार असल्याचे बोलले जात असले तरी विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपल्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यातच आता आणखी दोन नेत्यांनी या जागेवर दावा केल्याने याठिकाणी चांगलाच गोंधळ सुरु आहे.
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा आमचीच आहे. हेमंत गोडसे येथून दोन वेळ जिंकले आहेत, असे म्हणत नाशिकच्या जागेवर दावा केला होता. या पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील नाशिकची जागा आमचीच असल्याचा दावा केला आहे.
नाशिकची जागा शिवसेनेचीच Nashik Lok Sabha ।
दादा भुसे म्हणाले की, नाशिक लोकसभेची स्टँन्डींग जागा ही शिवसेनेची आहे. नैसर्गिक रित्या ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे हा दावा कायम आहे. या क्षणाला देखील आमचा दावा आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून मतदारसंघात चांगली कामे केलीत. महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील , तसे मार्गक्रमण करणे शिवसैनिकांच काम आहे.
महायुतीमध्ये सर्वजण एकविचारी Nashik Lok Sabha ।
लोकशाही प्रकियेत काही गोष्टी मागे पुढे होत असतात. काही ठिकाणी स्थानिक बाबी लक्षात घेऊन बदल करावा लागला मात्र बहुतांशी ठिकाणी विद्यमान खासदार आहेतच. महायुतीमध्ये सर्वांचे विचार एक आहेत. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री चर्चा एकत्र करतायत. आरपीआय गट महायुतीचा भाग आहे, एकदिलाने काम करणार आहोत. खा. आठवलेंना वरिष्ठ पातळीवर सन्मान दिला जाईल हा आम्हाला विश्वास असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा