Teri Baaton Main Aisa Ulijha Jiya On OTT| बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा ‘तेरी बातों मै ऐसा उल्झा जियां’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे. यामुळे आता घर बसल्या कुटुंबासोबत या चित्रपटाचा आनंद तुम्हाला घता येणार आहे. हा चित्रपट कुठे आणि कधी पाहायला मिळणार हे जाणून घेऊयात.
‘तेरी बातों मै ऐसा उल्झा जियां’ हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात वॅलेंटाइन वीकमध्ये म्हणजे ९ फेब्रुवारीला रिलीज झाला होता. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ५ एप्रिल रोजी स्ट्रीम झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने या चित्रपटाचे राइट्स विकत घेतले होते.
View this post on Instagram
त्यानंतर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चित्रपटाच्या स्ट्रीमिंगची अधिकृत घोषणा केली आहे. रिलीजच्या दोन महिन्यांनंतर हा चित्रपट ओटीटीवर आला आहे. प्राइम व्हिडीओने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून याची माहिती दिली आहे. Teri Baaton Main Aisa Ulijha Jiya On OTT|
‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साहने केले आहे. या चित्रपटामध्ये शाहिद आणि क्रितीसह ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी यांनीही काम केले आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्य या चित्रपटाने 133 कोटींची कमाई केली होती. Teri Baaton Main Aisa Ulijha Jiya On OTT|
हेही वाचा:
आप नेत्या आतिशी यांना निवडणूक आयोगाची नोटीस ; भाजपवर केलेल्या ‘या’ आरोपावरून कारवाई