Hemat Godse । राज्याच्या राजकाणात सध्या लोकसभा निवडणुकीवरून मोठी खलबतं होताना पाहायला मिळत आहे. त्यातच सध्या महत्वाची बातमी समोर येतीय. महायुतीमधील नाशिकच्या जागेवरून आता मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नाव निश्चित समजले जात असतांना शिंदे गटाचे इच्छुक हेमंत गोडसेमोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येतीय.
भुजबळ विरुद्ध गोडसेत चौथ्यांदा लढत? Hemat Godse ।
हेंमत गोडसे आणि शिवसेना पदाधिकारी हे पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर ही नाशिकची जागा शिवसेनेला सुटली नाही तर गोडसें अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येतंय. त्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध गोडसे यांच्यात चौथ्यांदा लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेंमत गोडसें अपक्ष लढणार ? Hemat Godse ।
नाशिक लोकसभा मतदारसंघातुन हेंमत गोडसें यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना अचानक छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्यानं हेंमत गोडसें आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या शिवसेनेच्या हेंमत गोडसें यांच्या उमेदवारी बाबत अनिश्चितता असल्यानं गोडसें अपक्ष लढण्याची शक्यता आहे. भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोडसे भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती वृत्तवाहिनीने दिली. विशेष म्हणजे या आधी तीन वेळा गोडसें आणि भुजबळ यांच्या सामना झालेला आहे.
2009 च्या निवडणुकीत समीर भुजबळ यांच्याकडून 22 हजारांच्या फरकाने पराभव झालेल्या गोडसेंनी पुढील दोन निवडणुकीत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ दोघांना ही धोबीपछाड देत भगवा फडकवला होता.
हे वाचा
“ज्या कोणाला तिकिट मिळेल…”; नाशिक मतदारसंघातील उमेदवारीबाबत भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका