Aap leader Atishi । दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत भाजपवर धमकावल्याचा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपावर निवडणूक आयोगाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केलीय. निवडणूक आयोगाने आज आतिशी यांना एक नोटीस बजावलीय. यामध्ये त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश किंवा तुरुंगात जाण्याच्या दाव्यावर उत्तर मागवण्यात आले आहे.
उत्तर देण्यासाठी दिला वेळ Aap leader Atishi ।
निवडणूक आयोगाने सोमवारपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ दिलाय. नोटीसच्या प्रत्येक परिच्छेदाला लेखी उत्तर द्यावे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री आतिशी यांना आचारसंहिता भंग केल्याचे म्हटले आहे. आतीशी यांनीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान (MCC) इतर कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध पुष्टी नसलेले आरोप, खोटी विधाने आणि मतदारांची दिशाभूल करण्यापासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले आहेत. आतिशी यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत बोलले होते.
तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनाही नोटीस पाठवली होती आणि विचारले होते की त्यांना पक्षात येण्याची ऑफर कोणाकडून मिळाली आहे. त्याचा खुलासा झाला पाहिजे. कोणत्या व्यक्तीने तुमच्याशी संपर्क साधला? तसेच सत्य बाहेर न आल्यास कायदेशीर मार्ग अवलंबला जाईल असेही भाजपने म्हटले होते.
आतिशी यांनी दावा केला होता Aap leader Atishi ।
2 एप्रिल रोजी दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता की, त्यांना भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर आली होती. याविषयी बोलताना,” मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मला भाजपसोबत येण्यास सांगण्यात आले अन्यथा येत्या महिनाभरात अंमलबजावणी संचालनालय माझ्या घरावर छापा टाकेल आणि मला अटक केली जाईल. याशिवाय मला, सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा आणि दुर्गेश पाठक यांना येत्या दोन महिन्यांत अटक करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस असल्याचा दावाही त्यांनी केला होता.