Sharmila Reddy vs Avinash Reddy – काँग्रेस पक्षाने मंगळवारी लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची 11वी यादी जाहीर केली. या यादीत आंध्र प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील 17 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या या यादीमध्ये वायएस शर्मिला रेड्डी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला असून त्यांना कडप्पा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कडप्पा हा रेड्डी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या, शर्मिला यांचे चुलत बंधू अविनाश रेड्डी यांच्याकडे आहे. ते वायएसआर काँग्रेस पक्षाचे कडप्पाचे खासदार आहेत.
शर्मिला, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांची बहीण आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. लागलीच त्यांची आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
राहुल गांधींचा शब्द अन् शर्मिला निवडणुकीच्या रिंगणात | Sharmila Reddy vs Avinash Reddy
शर्मिला रेड्डी यांनी मागील महिन्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबई येथे भेट घेतली होती. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांना, कडप्पा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सांगितले होते. राहुल गांधी यांनी शब्द टाकल्यानंतर शर्मिला यांनी देखील निवडणुकीसाठी होकार कळवला होता.
अविनाश रेड्डी तीन टर्म खासदार | Sharmila Reddy vs Avinash Reddy
येथील विद्यमान खासदार व शर्मिला रेड्डी यांचे चुलत बंधू अविनाश रेड्डी सलग दोन टर्म कडप्पा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पक्षाने यंदाही त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
अशातच काँग्रेसनेही आज उमेदवारांची यादी जाहीर केल्याने, कडप्पा लोकसभेत भाऊ – बहिणीचा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कडप्पा – वायएसआर कुटुंबाचा बालेकिल्ला । Sharmila Reddy vs Avinash Reddy
अविनाश यांचे वडील वाय एस भास्कर रेड्डी हे जगन व शर्मिला रेड्डी यांचे वडील माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय एस राजशेखर रेड्डी चुलत भाऊ आहेत. हे सर्व रेड्डी कुटुंबीय हे मूळचे कडप्पा जिल्ह्यातील पुलिवेंदुला शहरातील आहेत.
कडप्पा हा वायएसआर कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. याचे प्रतिनिधित्व राजशेखर रेड्डी यांनी केले ते कडप्पाचे चार वेळा खासदार होते. 2004 ते 2009 दरम्यान त्यांचे धाकटे बंधू वाय एस विवेकानंद रेड्डी येथील खासदार होते. त्यांच्यानंतर 2009 आणि 2011 मध्ये जगन मोहन रेड्डी यांनी कडप्पाचे दोनदा प्रतिनिधीत्व केले आहे.
त्यांच्यानंतर अविनाश रेड्डी हे येथील खासदार झाले. 2014 आणि 2019 निवडणुकांमध्ये त्यांनी रेड्डी कुटुंबाचा हा बालेकिल्ला आपल्याकडे कायम ठेवला आहे.
काँग्रेसची 11वी यादी