Unmesh Patil Jalgaon Lok Sabha : जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी थेट मुंबईत पोहोचल्याने ते ठाकरे गटात प्रवेश करणार असलायच्या चर्चांना उधाण आलं. अशात आता स्वतः उन्मेष पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्याने पाटील हे नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच शिवसेना ठाकरे गटात ते आणि त्यांच्या पत्नी प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे. अशात पाटील यांनी थेट संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे देखील समोर आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत आपली भूमिका मांडली. | Unmesh Patil Jalgaon Lok Sabha
पत्रकारांनी उन्मेष पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले,”मी याबाबत उद्याच तुमच्यासोबत संवाद साधेन.” तसेच पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर पाटील यांनी उत्तरे देणं टाळलं. आज मला तुम्हाला नाही म्हणताना वेदना होत आहेत. मात्र, यासंदर्भात मी उद्या सकाळी तुमच्यासोबत सविस्तर संवाद साधेन असं स्पष्ट मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.
यानंतर आता उन्मेष पाटील हे उद्या आपल्या पत्नीसह ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. अशात भाजपकडून त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न होतात का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. | Unmesh Patil Jalgaon Lok Sabha
कोण आहेत उन्मेष पाटील ?
उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. ते 2014 मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर त्यांनी खासदारकी लढवली आणि ते विजयी देखील झाले होते. मात्र यावेळी उन्मेष पाटील यांना भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळता स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीय. | Unmesh Patil Jalgaon Lok Sabha
चौदा बाय आठची खोली, दोन बिस्किटे…. कशी होती केजरीवालांची तिहारमधील पहिली रात्र, तब्येत देखील खालावली
FREE FREE FREE ! एक रुपयाही खर्च न करता 50 दिवस चालणार इंटरनेट.. Jio ने सुरु केला धमाकेदार प्लॅन