Rohit Pawar । पुण्यातील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणावरून ट्रोल होताना दिसून येत आहेत. पुण्याचा उमेदवार अशिक्षित, केवळ आठवी पास अशा आशयाचा ट्रोलिंग सध्या सुरु आहे. शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित’ असं लिहीलेला आणि धंगेकरांचा फोटो असलेला मेसेज सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. दरम्यान,या ट्रोलिंर्सला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चांगलेच सुनावले आहे.
शिक्षणावरुन आमदार @DhangekarINC जी यांना भाजपच्या IT सेलकडून केलं जाणारं ट्रोलींग हे अत्यंत दुर्दैवी आहे.. माझं शिक्षण हायस्कूलपर्यंतच झाल्याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान नरेद्र मोदी साहेब यांनी एका मुलाखतीत केल्याचं मला आठवतंय… तरीही ते दहा वर्षांपासून पंतप्रधान आहेत. स्व. वसंतदादा… pic.twitter.com/K0dGh69T9b
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 1, 2024
भाजपच्या IT सेलकडून केलं जाणारं ट्रोलींग दुर्दैवी Rohit Pawar ।
आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट करत धंगेकरांची पाठराखण केली आहे. यात त्यांनी “शिक्षणावरुन आमदार रवींद्रे धंगेकर जी यांना भाजपच्या IT सेलकडून केलं जाणारं ट्रोलींग हे अत्यंत दुर्दैवी आहे. माझं शिक्षण हायस्कूलपर्यंतच झाल्याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान नरेद्र मोदी साहेब यांनी एका मुलाखतीत केल्याचं मला आठवतंय. तरीही ते दहा वर्षांपासून पंतप्रधान आहेत. स्व. वसंतदादा पाटील यांचं शिक्षण कमी असूनही त्यांच्या मिटींगमध्ये IAS, IPS अधिकाऱ्यांना घाम फुटत असे.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीही अगदी अलिकडंच पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. परंतु हे सर्वजण पदावर आहेत. तर दुसरीकडं जे आपल्या नावापुढं डॉक्टर पदवी लावतात त्यांना हाफकिन ही संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नसतं, पण साडेसहा हजार कोटी रुपयांचा मलिदा खायचा, मात्र माहित असतं.”असा टोला लगावला आहे.
“नकोत नुसत्या गप्पा मुद्द्याच बोला” Rohit Pawar ।
“त्यामुळं शिक्षण आणि लोकसेवा याचा काहीही संबंध नसतो, याचं उत्तर कसब्याच्या पोटनिवडणुकीतच पुणेकरांनी दिलंय. त्यामुळं आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात आज कोणतेही मुद्दे नसल्याने आणि आताही पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांना शिक्षणावरुन ट्रोल करणं म्हणजे भाजपच्या IT सेलमध्ये ‘ज्ञानेश्वर विद्यापीठा’तील ‘पदवीधरां’ची भरती असल्याचा पुरावाच आहे, असं म्हणावं लागेल.”, असं रोहित पवार ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. तसेच, रोहित पवार यांनी नकोत नुसत्या गप्पा मुद्द्याच बोला असा हॅशटॅगही दिला आहे.