Abhay Patil Lok Sabha Election 2024| वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. तर भाजपने खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन दिवस उरले असताना काँग्रेसकडून देखील अभय पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता अकोल्यात तिहेरी रंगत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने 1 एप्रिल रोजी दोन लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेस पक्षाने अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांच्याशिवाय तेलंगणातील एक उमेदवार जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला राज्यात सात जागांवर पाठिंबा जाहीर केला आहे. Abhay Patil Lok Sabha Election 2024|
दरम्यान, ते स्वत: अकोल्यात लढत असल्याने काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देईल, अशी चर्चा होती. या मतदारसंघात प्रत्येक वेळी काँग्रेस आणि वंचितमध्ये मतविभाजन होऊन भाजपचा विजय झाला. मागील चार निवडणुकांमध्ये हाच अनुभव असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी एकत्र लढणार, असे मानले जात होते. परंतु इथे काँग्रेसने उमेदवार देऊन वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
अकोला लोकसभा निवडणुकीसाठीचे इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा pic.twitter.com/BHYMChIVPO
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 1, 2024
कोण आहेत डॉ. अभय पाटील ? Abhay Patil Lok Sabha Election 2024|
डॉ. अभय काशिनाथ पाटील हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. गेल्या 30 वर्षापासून अकोल्यात ऑर्थोपेडीक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. अकोल्यातील विघ्नहर्ता क्रिटीकल केअरचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय ते आयकॉन हॉस्पिटलच्या व्यवस्थापकी संचालकपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते जनरल सेक्रेटरी होते. ते एम.आर.आय. सेंटरचे व्यवस्थपकी संचालक व लायेंन्स क्लॅबचे माजी अध्यक्ष आहेत.
अभय पाटील यांच्यावर सालासर बालाजी मंदीर व गणेश चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापकी अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत 50 हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. 150 खाटांचे मल्टी स्पेशालिटी ऑयकॉन हॉस्पिटल सुरु केले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा देण्यासाठी प्रेरणादायी व्याख्याने देतात. अभय पाटील हे अकोला आणि वाशिम मध्ये मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक आहेत. काँग्रसने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा कार्ड वापरण्याची रणनिती आखल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ते यशस्वी होणार की नाही ते पाहावे लागणार आहे.
हेही वाचा: