लोणी धामणी, (प्रतिनीधी) – हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील श्री पिरसाहेब यात्रा उत्सव सोमवार (दि. १ एप्रिल) ते बुधवार (दि. ३) असे तीन दिवस संपन्न होणार आहे. सोमवार (दि. १) रोजी सांयकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत संदल कार्यकम होईल.
मंगळवार (दि. २) रोजी सकाळी ८ वाजता देवास शेरणी व दंडवते व शेरणी वाटप तसेच २ व ३ एप्रिल असे दोन दिवस सकाळी आठ ते सात वाजता बैलगाड्याच्या भव्य शर्यती संपन्न होणार आहेत.
त्यासाठी शनिवार (दि.३०) रोजी ९ ते १२ वाजता लकी ड्रॉ पध्दतीने टोकन काढले जातील. बैलगाड्यांसाठी एकूण इनाम ३,५१,९०० रुपये असून, प्रथम क्रमांकासाठी ७५,५५५ रुपये, द्वित्तीय क्रमांक-६५,५५५ रुपये, तृत्तीय क्रमांक-५५,५५५ रुपये, चतुर्थ क्रमांक-३५,५५५ रुपये, तसेच फायनलसाठी प्रथम क्रमांक-३१,००१ रुपये,
द्वितीय क्रमांक-२१,१०१ रुपये,तृतीय क्रमांक-११,००१ रुपये, चतुर्थ क्रमांक ९,००१ पाचवा क्रमांक ७,००१ घाटाचा राजा ११,१११ रुपये,वीस फूटावर कांडे ५,५५५ रुपये तसेच पहिल्यात पहिला येणाऱ्या गाड्यास -९००१ रुपये, दुसऱ्र्यात पहिला येणाऱ्र्या गाड्यास ७००१ रुपये, तिसऱ्र्यात पहिल्या येणाऱ्र्या गाड्यास ५००१ रुपया,चौथ्यात पहिला येणाऱ्र्या गाड्यास ३००१ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तसेच सतत तीन वर्ष प्रथम येणाऱ्या गाड्यास (सन २०२४ ते २०२६) गाड्यास ५ दुचाकी किंवा रोख रक्कम रुपये ३,५१,००१ रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. मंगळवारी (दि. २ एप्रिल) रात्री ९ वाजता अंजलीराजे नाशिककर यांचा लोकनाट्य तमाशाचा करमणुकीचा कार्यक्रम होईल. बुधवार, दि. ३ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन समस्त ग्रामस्थ वडगावपीर-मांदळेवाडी,मुंबई,पुणे व शिवछत्रपती ग्रामविकास प्रतिष्ठान व सर्व मंडळे यांनी केले आहे, असे ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.