Shah Rukh Khan Jai Shri Ram : शाहरुख खानने दुसऱ्या दिवशी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आपल्या होस्टिंग आणि परफॉर्मन्सने सर्वांची मने जिंकली. या प्री-वेडिंगमध्ये स्टार्सनी आपल्या जबरदस्त डान्सने खळबळ उडवून दिली. शाहरुख खान सलमान खान, आमिर खान हे एकत्र डान्स परफॉर्मन्स करताना दिसले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे होस्टिंग करताना किंग खानने आपल्या रॉयल एंट्रीने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी शाहरुखने जय श्री राम म्हणत केलेलया एंट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
शाहरुखने दिला जय श्री रामचा नारा
शाहरुख खानने अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये ‘जय श्री राम’चा नारा दिला आणि त्यानंतर कार्यक्रम होस्ट करायला सुरुवात केली. त्यावेळेसचा शाहरुख खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये तो कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांशी बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कार्यक्रमाचे होस्टिंग करण्यापूर्वीच शाहरुख ‘जय श्री राम’ म्हणत पाहुण्यांचे स्वागत करतो. | Shah Rukh Khan Jai Shri Ram
View this post on Instagram
शाहरुखने केला खास डान्स
बॉलिवूडच्या तिन्ही खानांनी पुन्हा एकदा एकत्र येत इतिहास रचला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या दुसऱ्या दिवशी शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी जामनगरमध्ये एकत्र डान्स करून सर्वांना वेड लावले. सुपरस्टार्सनी एकत्र स्टेज शेअर केला आणि ‘नाटू नाटू’ या गाण्यावर ठेका धरला. | Shah Rukh Khan Jai Shri Ram
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये सहभागी सेलिब्रिटी
शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान व्यतिरिक्त, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, सैफ अली खान, करीना कपूर खान, माधुरी दीक्षित, वरुण धवन, अनिल कपूर,सारा अली खान, इब्राहिम अली खान, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर उपस्थित होते. या पार्टीत इतर अनेक सेलेब्स देखील सहभागी झाले होते. | Shah Rukh Khan Jai Shri Ram