Bengaluru Rameshwaram Cafe Blast । बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी स्फोट झाला. या स्फोटात नऊ जण जखमी झाले आहे. कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाच्या काही वेळापूर्वी पटनाचा सॉफ्टवेअर इंजिनीअर कुमार अलंकृतही तिथे उपस्थित होता. अलंकृतने कॅफे स्फोटाचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
या घटनेबाबत आता अलंकृतने संपूर्ण माहिती दिली आहे. त्याने सांगितले,’मी कॅफेमध्ये गेल्यानंतर मी ऑर्डर केलेले फूड घेण्यासाठी काउंटरवर गेलो. मी फूड काउंटरवरून फूड घेऊन जात असतांना मला माझ्या आईचा कॉल आला आणि मी चालत चालत 10-15 मीटर गेलो’ त्याने पुढे या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली.
Bengaluru Rameshwaram Cafe Blast । रामेश्वरम कॅफे स्फोटावेळी नेमकं काय घडले
‘मी इडली आणि डोसा ऑर्डर केला होता. मी इडली कॅफे मध्ये बसून खाल्ली आणि त्यानंतर मी डोसा काउंटर जवळ गेलो. त्यावेळी माझ्या आईच्या कॉल आला आणि मी कॅफेत आवाज असल्यामुळे बाहेर पडलो.यानंतर काहीच सेकंदात मोठा आवाज झाला. मागे फिरून बघितले तर सर्वत्र नुसती धूळ होती. मी यापूर्वी असे कधीच बघितले नव्हते, मी रामेश्वरम कैफेच्या व्हाइटफील्ड ब्रांचमध्ये जेवणासाठी गेलो होतो. त्याने पुढे सांगितले की या स्फोटात ९ नऊ जण जखमी झाले आहे अशी माहिती ऐकली मात्र माझ्या मध्ये ही संख्या जास्त आहे. मी खूप लोकांना जळलेले बघितले. काही लोकांच्या कानातून सुद्धा रक्त निघत होते.’
दरम्यान, २४ वर्षीय अलंकृत सॉफ्टवेयर इंजीनियर आहे.तो ब्रूकफील्ड येथे रेंटने राहतो. रामेश्वरम कैफे पासून त्याचे घर काही मिनिटाच्या अंतरावर आहे.
दरम्यान, बंगळुरू कॅफेमध्ये स्फोट घडवणाऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. त्याचे वय 28 ते 30 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. तो कॅफेमध्ये आला आणि काउंटरवरून कूपन घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्याने रवा इडली मागवली, पण खाल्ली नाही. ज्या बॅगमध्ये बॉम्ब होता ती ठेवली आणि निघून गेला.
हेही वाचा
Prakash Ambedkar on bjp | ‘…तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाणार’ प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं