कार्ला, (वार्ताहर) – दहावीच्या विद्यार्थ्यांना कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयात परीक्षेला जावे लागते. त्यात मुलींचे प्रमाण जास्त असल्याने या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मावळचे आमदार सुनील शेळके फाउंडेशनच्या वतीने बारावी प्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांंनाही मोफत बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
तसेच कार्ला येथील एकविरा विद्या मंदिर शाळेतील दहावीच्या विद्यार्थांंना आमदार सुनील शेळके फाउंडेशनच्या वतीने परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी शिवसंग्राम प्रतिष्ठान व उद्योजक नितीन तुकाराम वाडेकर यांनी सर्व विद्यार्थांंना पेनचे वाटप केले. या वेळी कार्ला ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे, मुख्याध्यापक संजय वंजारे, फाउंडेशनचे अमोल वायकर, उद्योजक अमोल हुलावळे, नितीन वाडेकर, गणेश हुलावळे, विशाल जमदाडे, पांडुरंग हुलावळे, रामदास भेगडे, उमेश इंगुळकर, संजय हुलावळे, बाबाजी हुलावळे, सचिन हुलावळे, उल्हास हुलावळे, शिवाजी हुलावळे, श्रीहरी भोसले आदी उपस्थित होते.