वडोदरा – गुजरातमधील वडोदरा शहरात गुरुवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे हरणी तलावात बोट उलटल्याने १० विद्यार्थी, २ शिक्षकांचा मृत्यू झाला. दरम्यान, इतर ११ मुले आणि २ शिक्षकांना वाचवण्यात यश आले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यू सन राइज शाळेतील सर्व मुलांना तलावात सहलीला आणण्यात आले होते. त्यांच्यासोबत चार शिक्षकही होते. अपघातादरम्यान सर्व मुले लाइफ जॅकेटशिवाय बोटीत होती.
दरम्यान, राज्यमंत्री कुबेर दिंडोर यांनी सहा विद्यार्थ्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. सीएम भूपेंद्र पटेल यांनी ट्विट केले की, वडोदराच्या हरणी तलावात बुडून मुलांची बातमी खूप दुःखद आहे. ज्यांनी जीव गमावला त्या मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. या दुःखाच्या क्षणी मी दु:खी आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव देवो. बोटीत बसलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
हे सर्व विद्यार्थी वडोदरा येथील न्यू सनराईज स्कूलमधील असून ते येथे सहलीसाठी आले होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले होते, त्यामुळे ही घटना घडल्याचे समोर येत आहे. बोटीवर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते.
सात एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर हरणी तलाव आहे. या तलावाचे सुशोभीकरण सन २०१९ मध्ये करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.