South Africa Lowest Test Total In Test Against India : दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे सुरू झाला, ज्याच्या पहिल्या सत्रात असे काही घडले ज्याची दोन्ही संघांना अपेक्षा नव्हती. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतर फलंदाजीत त्यांची अत्यंत खराब कामगिरी दिसून आली आणि आफ्रिकेचा संपूर्ण संघ 23.2 षटकात अवघ्या 55 धावांत गारद झाला.
A sensational display of pace bowling from India bundles South Africa out before Lunch on Day 1 😵#WTC25 | 📝 #SAvIND: https://t.co/ie8HUxBDc8 pic.twitter.com/UlvULpTvhf
— ICC (@ICC) January 3, 2024
आफ्रिकन संघाला सामन्यात पूर्ण सत्रही फलंदाजी करता आली नाही. एकूण 55 धावांसह आफ्रिकेने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वात लहान धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम केला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्या कसोटीत किल्ल्याप्रमाणे मजबूत दिसणाऱ्या आफ्रिकन फलंदाजीला उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाचे योगदान दिले, त्याने 6 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
याआधी न्यूझीलंडच्या नावावर भारताविरुद्धच्या कसोटीत सर्वात कमी धावसंख्येचा लाजिरवाणा विक्रम होता, जेव्हा 2021 मध्ये वानखेडेवर किवी संघ भारतीय संघाविरुद्ध 62 धावांत ऑलआऊट झाला होता. पण दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 55 धावांवर ऑलआऊट होऊन हा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
केवळ भारताविरुद्धच नव्हे तर मायदेशातील कसोटी क्रिकेटमध्ये आफ्रिकेसाठी सर्वबाद 55 धावा ही डावातील सर्वात लहान धावसंख्या होती. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान आफ्रिकेचा संघ फलंदाजीत खूप मजबूत दिसत होता, पण दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा संघ कमकुवत इमारतीसारखा कोसळला.
सिराजसह भारतीय गोलंदाजांनी केला कहर…
IND vs SA 2nd Test Day 1 : सिराजचा विकेटचा षटकार, पहिल्या डावात द. आफ्रिका अवघ्या 55 धावांत गारद…
डावाच्या सुरुवातीपासूनच भारताने आफ्रिकेला रोखून धरले, ज्यामध्ये मोहम्मद सिराजने महत्त्वाची भूमिका बजावली. आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने 6 षटकांतच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सिराजने प्रथम एडन मार्कर (02) आणि नंतर पहिल्या कसोटीत शानदार शतक झळकावणाऱ्या डीन एल्गर (04) यांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. सिराजने अवघ्या 15 धावांत 6 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी आपल्या खात्यात 2-2 विकेट घेत आफ्रिकेचा डाव 55 धावांत गुंडाळला.