Manoj Bajpayee : हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता म्हणून ‘मनोज बाजपेयी’ याच्याकडे बघितलं जातं. मनोज बाजपेयीने बॉलिवूडसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
अभिनेत्यानं आपली नवीन वर्षाची सुरुवातही उत्तम प्रकारे केली आहे. ज्यामुळे लोक प्रेरित होत आहेत. मनोज बाजपेयीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक शर्टलेस फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये अभिनेत्याचे अॅब्स दिसत आहेत.
मनोज बाजपेयी यांचे अभिनय कौशल्य सर्वांनाच माहिती आहे पण त्यांची शरीरयष्टी इतकी चांगली आहे हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. इंस्टाग्राम पोस्टवर लोक सतत कमेंट करत आहेत.
एका यूजरने लिहिले आहे, “हे abs आतापर्यंत कुठे लपवले होते? अनुराग कश्यपने लिहिले, “हिडन रुस्तम. तर सुनील ग्रोव्हरने लिहिले, “तुम्ही इंटरनेट पेटवले आहे’. अश्या प्रकारच्या कमेंट या फोटोवर येत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेता मनोज बाजपेयीला इंडस्ट्रीत त्याच्या गंभीर भूमिकांसाठी ओळखले जाते. या अभिनेताचा चाहता वर्ग फार मोठा आहे. चाहत्यांना त्याचा अभिनय फार आवडतो. त्यामुळे या चित्रपटाला बघण्यासाठी अनेकजण फार आतुर असणार हे नक्की.
कारण यापुर्वी देखील ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटाद्वारे बाजपेयीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या नजरेत आपली एक वेगळी छाप पाडली आहे.