Shivali Parab – अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि प्रेक्षकांच्या “टेन्शनवरची मात्रा – महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आपल्या विनोदाच्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. यातील अभिनेत्री शिवाली परब आपल्या हास्य अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना हसवत असते. शिवालीचा चाहता वर्ग नेहमीच सोशल मीडियावर तिच्या हास्य अभिनयाचे विडिओ शेअर करत असतात. ती सुद्धा सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या लाईफचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
View this post on Instagram
अशात सोशल मीडियावर नुकतेच शिवालीने एक व्हिडीओ पोस्ट करत तिच्या करिअरच्या सुरुवातील तिने कसा स्ट्रगल केला तेव्हाच अनुभव तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ती म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातला पहिला इव्हेंट म्हणजे ‘आगरी महोत्सव’ हा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी या स्टेजवर परफॉर्म करत आहे. तेव्हा मी मागे असलेल्या ५- ६ मुलींच्या मध्ये उभी होते. आणि आज मी डायरेक्ट या कार्यक्रमामध्ये स्वत:चं स्किट सादर करत आहे’. यासोबत तिने व्हिडिओही शेअर केला आहे. या विडिओमध्ये ती पर्फोर्मंस करतांना दिसत आहे, तिने या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की,’असंच तुम्हा सगळ्यांच प्रेम आणि आशिर्वाद माझ्यासोबत असू द्या… धन्यवाद’. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
शिवालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, शिवाली परब ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. शिवालीने मालिका व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘प्रेम, प्रथा, धुमशान’ या चित्रपटात शिवाली मुख्य भूमिकेत दिसली होती.