लिसबन – पावसाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने महापूर येण्याची घटना जरी वेगळी नसली तरी पोर्तुगालमधील एका गावामध्ये नुकताच रेड वाइनचा महापूर आल्याने या घटनेची मात्र चर्चा झाली पोर्तुगाल मधील साओ लुरूंको येथे ही घटना घडली या गावातच असणाऱ्या एका डिस्टीलरीमधील दोन टाक्या अचानक फुटल्याने या टाक्यामधील रेड वाइन संपूर्ण गावांमधील रस्त्यातून वाहू लागली.
⚡️Red wine has “flooded” the streets in the Portuguese municipality of Anadia after two tanks exploded at a local winery, radio station Rádio Renascença reported. pic.twitter.com/VHLcadfLlp
— War Monitor (@WarMonitors) September 11, 2023
आणि गावातील सगळे रस्ते लाल भडक झाले या दोन टाक्या फुटल्याने सुमारे 22 लाख लिटर रेड वाईन रस्त्यावरून वाहू लागली ज्या गावामध्ये ही घटना घडली ते गाव डोंगर उतारावर वसले असल्याने गावातील सर्वच भागामध्ये उताराच्या दिशेने रेड वाईन पसरली अनेक घरांमध्ये बेसमेंटमध्ये आणि तळ घरातही रेड वाइन साठून राहिली तर गावातील शेतामध्ये सुद्धा ही वाईन घुसली.
या घटनेनंतर संबंधित कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे तसेच या घटनेमुळे ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई करून देण्याची तयारीही दर्शवली आहे सुदैवाने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीसाठ्यांमध्ये ही रेड वाइन गेली नसल्याने पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही पण गावातील स्थानिक अधिकाऱ्यांनी आता नुकसानाचा आढावा घेण्यात सुरुवात केली आहे संबंधित कंपनीनेही डिस्टीलरीमधील या दोन टाक्या का फुटल्या याची चौकशी सुरु केली आहे.