LPG Gas Cylinder Price : देशभरात नुकतीच दिवाळी आनंदात पार पडली आहे. दरम्यान, या दिवाळीनंतर आता आज तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या मोठा दिलासा दिला आहे. कंपनीकडून एलपीजी (LPG) दरात कपात करण्यात आली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी नवे दर जारी केले असून एलपीजीचे दर कमी करण्यात आली आहेत. तेल वितरण कंपन्यांनी आज गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांहून अधिक कपात केली आहे. आज एलपीजी गॅल सिलेंडर 78 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
दिवाळीनंतर एलपीजीच्या किमतीत घसरण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तेल कंपन्यांकडून एलपीजीच्या 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Gas Cylinders Price Hike) किंमतीत कपात करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
आज व्यावसायिक गॅस सिलेंडर 78 रुपयांनी स्वस्त झाला आहे. याआधी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 209 रुपयांनी वाढले होते.
तेल वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किमती जाहीर करतात. पण काही वेळा महिन्याच्या मधेही सिलेंडरच्या दरात बदल करण्यात येते. आजही सिलेंडरचे दर कमी झाले आहेत. इंडियन ऑइल (IOCL) च्या वेबसाइटनुसार, राजधानी दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबर 2023 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1833.00 रुपये होती, ही किंमत 1755.50 रुपयांवर आली असल्याची दिसून येत आहे.