मुंबई – 2004 मध्ये अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) त्याची आधीची पत्नी अमृता सिंगपासून घटस्फोट घेऊन वेगळा झाला. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांनी सैफच्या आयुष्यात करिनाची एंट्री झाली. 2007 मध्ये सैफ आणि करीना कपूर खान ‘टशन’च्या सेटवर प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. नुकतंच करीना कपूर खानने (Kareena Kapoor ) एका मुलाखतीत खुलासा केला आहे की ती आणि सैफ अली खान लग्नापूर्वी पाच वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.
‘टशन’च्या शूटिंगदरम्यान दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि एकत्र राहायलाही सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न का केले हे सांगितले. करीना म्हणाली,”आम्ही पाच वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिलो. यानंतर आम्ही पुढचे पाऊल उचलले कारण आम्हाला मुले हवी होती.(Kareena Kapoor leave in relashanship)
करीना कपूर मुले आणि काम कसे हाताळते
करिनाने सांगितले की, ती कोणत्याही दबावाशिवाय मुलांचे संगोपन करते. ती तिचे आयुष्य त्याच्यासोबत जगते, जेणेकरून मुलं देखील त्यांचे आयुष्य आनंदाने जगू शकतील. करीना म्हणाली,”मी माझे आयुष्य माझ्या मुलांसमोर जगत आहे. मला त्याच्याबरोबर सर्व काही करायचे आहे. आपण आनंदी राहायला हवे, तरच त्यांची भरभराट होईल. माझ्या मानसिक आरोग्यासाठी मी सर्वात प्रथम जबाबदार आहे.”
करीना कपूर आणि सैफ अली खान यांना दोन मुले आहेत. 2016 मध्ये करिनाने तैमूरला (Taimur) जन्म दिला, तर 2021 मध्ये दोघांनी जेह अली खानचे (Jeh khan) स्वागत केले. सैफला त्याच्या माजी पत्नीपासून सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत.