World Cup 2023 BAN vs NED Match Live Score Updates : विश्वचषकाच्या 28व्या सामन्यात बांगलादेशसमोर नेदरलँड्सचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकातामध्ये खेळल्या जाणार्या या विश्वचषकातील हा पहिलाच सामना आहे. नेदरलँड्स चा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर नेदरलँड्सचा संघ 50 षटकांत सर्वबाद 229 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. आता बांगलादेशला विजयासाठी 230 धावा करायच्या आहेत. हा सामना गमावणारा संघ विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
angladesh 🆚 Netherlands 🏏
Bangladesh need 230 Runs to Win 🇧🇩
Photo Credit: ICC/Getty#BCB | #NEDvBAN | #CWC23 pic.twitter.com/pN77y1dbPm
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 28, 2023
नेदरलँड्स संघाने बांगलादेशला 230 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले आहे. नेदरलँड्सकडून फलंदाजीत कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 89 चेंडूत 68 धावा केल्या. त्यांच्याशिवाय वेस्ली बॅरेसीने 41 आणि सायब्रँडने 35 धावांचे योगदान दिले. लोगान व्हॅन बीकने नाबाद 23, बास डी लीडेने 17 आणि कॉलिन अकरमनने 15 धावा केल्या. आर्यन दत्त नऊ, शरीझ अहमद सहा आणि विक्रमजीत सिंग तीन धावा करून बाद झाला. मॅक्स ओडाड आणि पॉल व्हॅन मीकरेन यांना खातेही उघडता आले नाही.
बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि महेदी हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शकीब अल हसनला मात्र एक गडी बाद करता आला.
दरम्यान, बांगलादेश आणि नेदरलँड्ससाठी उपांत्य फेरी गाठण्याचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. आता अंतिम चारमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येक सामना जिंकावा लागेल. यासोबतच दोन्ही संघांना इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.