ICC ODI World Cup 2023 New Zealand vs Netherlands : एकदिवसीय विश्वचषकाच्या सहाव्या सामन्यात न्यूझीलंडसमोर नेदरलँडचे आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. न्यूझीलंड संघाच्या नजरा सलग दुसऱ्या विजयावर आहेत. त्याचबरोबर नेदरलँड्सचा या मोहिमेत पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. त्याचवेळी नेदरलँड्सला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना विल यंग, टॉम लॅथम आणि रचिन रवींद्र यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर नेदरलँड्स संघासमोर 323 धावांचे आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंड संघानं 50 षटकांत सात विकेट्स गमावून 322 धावा केल्या.
Time to bowl in Hyderabad! Will Young (70), Tom Latham (53) and Rachin Ravindra (51) top scoring in the batting effort. Follow play LIVE in NZ with @skysportnz. LIVE scoring | https://t.co/yjDWlW2uBm #CWC23 pic.twitter.com/wm1qz126sk
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 9, 2023
न्यूझीलंडकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. विल यंगने 70, टॉम लॅथमने 53 आणि रचिन रवींद्रने 51 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त डेरिच मिशेलने 48 धावांचे, मिचेल सँटनरने नाबाद 36 आणि डेव्हन कॉनवेने 32 धावांचे योगदान दिले. मॅट हेन्री 10 धावा करून नाबाद राहिला. मार्क चॅपमनने पाच आणि ग्लेन फिलिप्सने चार धावा केल्या. नेदरलँड्सकडून गोलंदाजीत आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन आणि रीलोफ व्हॅन डर मर्वे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर बास डी लीडे याला एक गडी बाद करण्यात यश आले.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
न्यूझीलंड :- डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कप्तान/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
नेदरलँड्स : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (कप्तान/कर्णधार), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, रायन क्लाइन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.