नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी याना सौम्य तापाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी या सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi has been admitted to Delhi's Sir Gangaram Hospital with symptoms of mild fever. She is under doctors' observation and is currently stable: Sources pic.twitter.com/9uuZz8n4ra
— ANI (@ANI) September 3, 2023
सोनिया गांधी यांना मार्चमध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र, एका दिवसानंतर जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये त्यांची प्रकृती स्थिर असून ते पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगण्यात आले.
सोनिया गांधी सध्या राजकारणात सक्रिय दिसत आहेत. नुकत्याच मुंबईत झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी बंगळुरू येथे झालेल्या विरोधी एकतेच्या बैठकीतही त्या सहभागी झाल्या होत्या.