मुंबई – बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा या कपलची कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चा रंगलेली असते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसतात. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. कधी या स्टार्सना ट्रोल केलं जातं तर कधी लाईकही केलं जातं.
अर्जुन आणि मलायका अनेकदा एकमेकांवर किती प्रेम करतात हे व्यक्त करतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासुन या दोघांच्या ब्रेकअपची बातमी तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे कपल वेगळं झाल्याचं यातून सांगण्यात आलं आहे. अर्जुन कपूरचं नाव सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलाबरोबर जोडलं जात आहे. ते दोघेही डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
अर्जुन पासून वेगळं झाल्यानंतर मलायाकाने त्याच्या नात्यातील सर्व लोकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून अर्जुन कपूरच्या बहिणी अंशुला कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांना अनफॉलो केले आहे. मात्र, अश्यातच अर्जुनने मलायकाबरोबरच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानच मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. मलायकाने आंतरराष्ट्रीय श्वान दिनानिमित्त तिच्या पाळीव कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने “यापेक्षा चांगला सोबती मिळू शकत नाही. माझ्या सुपरस्टारबरोबर प्रत्येक दिवस साजरा करते”, असं कॅप्शन दिलं आहे.
मलायकाच्या या पोस्टवर अर्जुनने कमेंट केली आहे. “तुझ्या आयुष्यातील खरा स्टार..” अशी कमेंट अर्जुनने केली आहे. मलायकाच्या पोस्टवर कमेंट करत अर्जुनने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आणि नुकतंच मुंबईतील एका हॉटेल बाहेर अर्जुन आणि मलायका सोबत स्पॉट करण्यात आलं होत. त्याचे सोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.