मुंबई – शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘जवान’ या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच असून चित्रपटासाठीचे काउंट डाउन आता सुरू झाले आहे. शाहरुख खानने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या आणखी एका नव्या पोस्टरचे अनावरण केले.विशेष म्हणजे जवानचा टीजर रिलीज झाल्यापासून शाहरुखच्या या नव्या अवताराची प्रचंड चर्चा होती.
जवानमध्ये शाहरुखच्या पूर्णतः मुंडन असलेल्या लूकची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली होती. यावरूनच या चित्रपटात काहीतरी भन्नाट असणार हे निश्चित झालं होत. शाहरुखच्या या नव्या अवताराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती. अशात शाहरुखने सोशल मीडियावरून जवानचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे.ज्यामुळे एस आर केचा हा नवा लूक पुन्हा चर्चेत आला आहे.
‘जवान’ची प्रतीक्षा बर्याच दिवसांपासून होती आणि या नव्या पोस्टरमुळे, चित्रपटाच्या भव्य प्रदर्शनासाठीची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या चित्रपटाबाबत आतापर्यंत बाहेर आलेल्या साऱ्याच कंटेंटने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून त्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे.
Main achha hoon ya bura hoon… 30 days to find out. Ready AH?#1MonthToJawan#Jawan releasing worldwide on 7th September 2023, in Hindi, Tamil & Telugu. pic.twitter.com/O47jh05lnj
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 7, 2023
‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ प्रेझेंटेशन ‘जवान’ चे दिग्दर्शन ‘एटली’ यांनी केले असून ‘गौरी खान’ यांची निर्मिती आहे आणि ‘गौरव वर्मा’ सह-निर्माते आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.