मुंबई – अभिनेत्री रुबिना दिलैक नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. इन्टाग्रामवर वेगवेगळे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. असाच एक व्हिडिओ दोन दिवसांपुर्वी रुबिनाने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रुबिनाचा अतिशय सुंदर लूक पाहायला मिळत आहे. पण आता हा व्हिडीओ पाहून ती गरोदर आहे की काय? अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे चाहते तिचे अभिनंदन करत आहेत.
रुबिनाने 2018 साली अभिनव शुक्लाबरोबर लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. हे कपल कधी गुड न्यूज देणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अशताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ब्लॅक सिंपल गाऊन आणि नंतर प्रिंटेड थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, यावरून रुबिनाबाबत भलत्याच चर्चा रंगल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “छोटा अप्पू किंवा रुबी लवकरच येत आहे.” तर दुसर्याने लिहिले “तुझ्या प्रेग्नेंसीबद्दल अभिनंदन. आम्ही खूप आनंदी आहोत”. आणखी एकाने लिहिले की, “तुझे पोट हे सांगत आहे… बाळा.”
View this post on Instagram
दरम्यान, रुबिना लवकरच आई होणार असे समजून काही चाहत्यांनी तिचे अभिनंदन देखील केले आहे. मात्र, रुबिना खरंच गरोदर आहे का? ती खरंच आई बनणार आहे का ? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय, रुबिनाने देखील अशी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. मात्र, चाहत्यांच्या कमेंट पाहून रुबिना काय प्रतिक्रिया देते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.