न्यूयॉर्क : एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासूनच रोज ट्विटरमध्ये अनेक नवनवीन निर्णय घेण्यात येत आहेत. आता ट्विटरने युजर्सच्या ट्वीट पाहण्यावरही निर्बंध लादले आहेत. त्यातच आता ट्विटरने ऑफिशियली सर्वांसाठी TweetDeck चे नवीन वर्जन लॉन्च करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून ट्वीटडेक वापरताना युजर्सना काही समस्यांचा सामना करावा लागत होता. या समस्या कमी करण्यासाठी ट्वीटडेकचं हे नवं वर्जन मदत करणार आहे. दरम्यान, ट्वीटडेक 30 दिवसांत एक व्हेरिफाइड फिचर होणार आहे. म्हणजेच, जर युजर्सना ट्वीटडेक वापरायचे असेल तर त्यासाठी ट्विटर ब्लू मेंबरशिप घ्यावीच लागेल.
We have just launched a new, improved version of TweetDeck. All users can continue to access their saved searches & workflows via https://t.co/2WwL3hNVR2 by selecting “Try the new TweetDeck” in the bottom left menu.
Some notes on getting started and the future of the product…
— Twitter Support (@TwitterSupport) July 3, 2023
यापूर्वी ट्वीटडेकचा वापर युजर्सना फ्रीमध्ये करता येत होता. तसेच, कंटेंट मॉनिटर करण्यासाठी बिझनेस आणि न्यूज ऑर्गनायझेशनद्वारे वापर केला जातो. त्यामुळे कंपनीनं याच्या वापरासाठी ट्विटर ब्लू मेंबरशिप घेणं अनिर्वाय केलं आहे. कंपनीने उचललेल्या या पावलामुळे ट्विटच्या रेवेन्यूमध्ये नक्कीच वाढ होणार आहे.
TweetDeck आता फुल कंपोजर फंक्शनॅलिटीला सपोर्ट करणार आहे. ज्यामध्ये युजर्सना व्हिडीओ डॉकिंग, पोल्स आणि इतरही अनेक फिचर्सचा वापर करणं शक्य होणार आहे. सध्या TweetDeck चे फंक्शन टेंपरेरी अनअवेलेबल आहे, हे लवकरच म्हणजेच, 30 दिवसांच्या आतच रिस्टोर केले जाणार आहे. परंतु, याच्या वापरासाठी युजर्सकडे व्हेरिफाईड अकाउंट असणे अत्यंत गरजेचे असणार आहे.