न्यूयॉर्क : NASA ने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर उगवलेल्या फुलाचे मनमोहक फोटो शेअर केले आहे, या फुलामुळे अवकाशातील कुतुहल आणखी वाढले असल्याचे दिसत आहे. NASA ने स्पेस फ्लॉवरचे एक सुंदर चित्र पोस्ट शेअर केली आहे.
नासाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये,“आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर व्हेजी सुविधेचा एक भाग म्हणून झिनिया (Zinnia) या फुलझाडाला वाढवले गेले. शास्त्रज्ज्ञ १९७० पासून अंतराळातील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत, परंतु २०१५ मध्ये NASA अंतराळवीर केजेल लिंडग्रेन (Kjell Lindgren) यांनी ISS वर हा विशेष प्रयोग सुरू केला होता.
View this post on Instagram
नासाने फुलाचे फोटो शेअर करुन पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, “आमचे स्पेस उद्यान केवळ दिखाव्यासाठी नाही. अंतराळ कक्षेत वनस्पती कशा वाढतात हे जाणून घेताना, पृथ्वीवरील पिके येथे कशी उगवता येतील हे समजून घेण्यास मदत होईल. जे चंद्र, मंगळ आणि त्यापुढील दीर्घ कालावधीच्या मोहिमांमध्ये ताज्या अन्नाचा एक मौल्यवान स्त्रोत प्रदान करेल. @NASAAstronauts ने ISS वर इतर भाज्यांसह कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारी पाने, टोमॅटो आणि मिरचीची लागवड केली आहे आणि बऱ्याच पिकांची लागवड करण्यात आली आहे.
NASA द्वारे शेअर केलेल्या स्पेसमधील झिनियाच्या फुलाला फिकट नारिंगी पाकळ्या पूर्ण फुललेल्या आहेत. त्याची गुंतलेली पाने चित्राच्या वरच्या डाव्या कोपऱ्यापर्यंत पसरलेली दिसतात. एकूणच, हे स्पेस फ्लॉवर खूप सुंदर दिसत असून ही आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. लोकांना हे स्पेस फ्लॉवर खूप आवडते. नासाच्या या पोस्टला ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.