मुंबई – शिल्पा शेट्टी ही सुपरहॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या फिटनेसमुळे ती विशेष चर्चेत असते. सोशल मीडियावर ती सक्रिय असून अनेक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. नुकतेच तिने बिकिनी लूकमधील तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंस्टाग्रामवर शिल्पा शेट्टीने तिचे हॉट अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलजवळ उभी असलेली दिसते. यावेळी तिने कलरफुल बिकिनी परिधान केली आहे. शिल्पाचा वयाच्या 48 व्या वर्षी देखील इतका परफेक्ट अंदाज पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. या बिकिनीमध्ये ती तिची सुंदर फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
तिच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटिंनी कमेन्ट केल्या आहेत. अभिनेत्री राखी सावंतने शिल्पाच्या फोटोवर हार्ट इमोजी टाकला आहे. सध्या या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शिल्पा रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये दिसणार आहे. या वेब सीरीजमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉयही दिसणार आहेत. याशिवाय ती अमित साधसोबत ‘सुखी’मध्येही दिसणार आहे.