मुंबई – ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. नव्या संसद भवनाच्या कार्यक्रमादिवशी पोलिसांनी कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुस्तीपटूनि अधिक आक्रमक होत आपले मेडल्स गंगेत अर्पण करणार असल्याचा निर्णय घेतला. कुस्तीपटूंनाच्या या निर्णयाला अनेक खेळाडूंनी पाठींबा देखील दिला आहे. अशात भाजप खासदार पंकजा मुंडे यांनीही खेळाडूंनी पाठींबा दिला आहे. तसेच मोदी सरकारला घरचा आहेर देत आपली भूमिका मंडळी आहे.
प्रीतम मुंडे म्हणाल्या,’ केवळ खासदारच नाही, तर एक महिला म्हणून मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. यातील सत्य समोर यायला हवे होते. लोकशाहीत ही घटना स्वागतार्ह नसल्याचे त्या म्हणाल्या.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जागतिक कुस्ती महासंघाचे ताशेरे
ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या प्रकरणावरून आंदोलन करत असलेल्या भारतीय कुस्तीपटूंना मिळत असलेली वागणून अत्यंत लाजीरवाणी आहे, असे ताशेरे जागतिक कुस्ती महासंघाने लगावले आहेत. भारतातील केंद्रीय यंत्रणा या कुस्तीपटूंकडे दुर्लक्ष करत आहे व त्यामुळे केवळ या खेळाचीच नव्हे तर संपूर्ण देशीा प्रतिमा मलिन होऊ शकते, असेही जागतिक महासंघाने म्हटले आहे.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण यांच्यावर खटले दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळेच हे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. मात्र, भारतीय केंद्रीय यंत्रणेतील कोणीही व्यक्ती त्यांची साधी भेटही घेऊ शकलेला नाही.