Ayodhya : राम मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिराच्या पुजाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. यासोबतच त्यांना इतर सुविधाही देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रस्टने मंदिराचे मुख्य पुजारी आणि कर्मचारी – स्टोअर कीपर (कोठारी), व्यवस्थापक (भंडारी) आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 35 ते 40 टक्क्यांनी वाढ केली आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, वाढीव पगारासह, ट्रस्ट मंदिरातील कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टीसह घर आणि वैद्यकीय भत्ता देखील देण्यात येईल. ट्रस्टचे सचिव चंपत राय म्हणाले की, ट्रस्ट पुजारी आणि पूजा व्यवस्थापनात गुंतलेल्या इतर कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधीही दिला जाईल. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी माध्यमांशी बोलताना कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाल्याची पुष्टी केली.
सत्येंद्र दास यांनी केले कौतुक –
आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, ट्रस्टचे हे चांगले पाऊल आहे. या वाढीमुळे मुख्य पुजाऱ्यांचा पगार 25 हजार रुपयांवरून 32,900 रुपये प्रति महिना झाला आहे, तर सहाय्यक पुजाऱ्यांना आता दरमहा 20,000 रुपये मानधन मिळणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने यापूर्वी मे महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली होती. अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मंदिर बांधणीचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल –
राम मंदिराच्या उभारणीसोबतच अयोध्या शहरालाही नवसंजीवनी दिली जात आहे. 22 जानेवारी 2024 रोजी नवीन मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, मंदिराचे संपूर्ण बांधकाम डिसेंबर 2025 मध्ये पूर्ण होईल. मंदिराचा तळमजला जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल. तर मंदिराचा दुसरा टप्पा डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण होईल.