बारामती (प्रतिनिधी) – बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेचे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती” असे नामकरण करण्याचा निर्णय शासनाने आज घेतला. राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी हा निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयने आयुक्त यांनाआवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ०३. जानेवारी २०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता मिळाली होती. बारामती येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.
०५. जुलै २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्यात आली आहे. सदर संस्थेचे नामाधिकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.