अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात क्वालिफायर 2 ची लढत होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो येत्या रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अंतिम सामना खेळेल.
पावसामुळे टॉसला 45 मिनिटे उशीर झाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@mipaltan win the toss and elect to field first against @gujarat_titans in Ahmedabad.
Follow the match ▶️ https://t.co/f0Ge2x8XbA#TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI pic.twitter.com/BdK4DQl7Qr
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (Wk), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पंड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
मुंबई इंडियन्स : इशान किशन (wk), रोहित शर्मा (C), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल.
इम्पैक्ट सब्सीट्यूट खेळाडू –
गुजरात : जोशुआ लिटिल, श्रीकर भरत, ओडेन स्मिथ, आर साई किशोर, शिवम मावी.
मुंबई : रमनदीप सिंह, विष्णु विनोद, नेहल बधेरा, संदीप वारियर, राघव गोयल.
दरम्यान, गुजरातचा संघ बलाढ्य मानला जात असला तरीही पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांना चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता. त्या उलट सरुवातीपासून चाचपडत असलेल्या मुंबई इंडियन्सने नंतरच्या सामन्यांत कमालीचे सातत्य राखले आहे. तसेच त्यांनी एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपर जायंट्सला धूळ चारत क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात स्थान मिळवले.