इंदापूर – इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी 14 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर उमेदवारी अर्ज माघार घ्यायच्या शेवटच्या दिवसापर्यंत 108 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज (गुरुवार ता. 20 एप्रिल) रोजी मागे घेतले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जे.पी. गावडे यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक लागली असून, या बाजार समितीमध्ये एकूण 18 जागा आहेत. यापैकी चार मतदार संघातील उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. उमेदवारीच्या रिंगणात असलेले उमेदवार कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदारसंघातून 15 उमेदवार रिंगणात आहे.
यामध्ये शिवाजी इजगुडे, अशोक घोगरे, विलासराव घोळवे, सुभाष जगताप, आप्पासाहेब जगदाळे, उल्हास जाधव, मनोहर डुखे, तानाजीराव निंबाळकर, संग्रामसिंह निंबाळकर, महारुद्र पाटील, संदीप पाटील, दत्तात्रय फरतडे, विलास माने, रोहित मोहोळकर, संपत सरक, तर कृषी पतसंस्था महिला प्रतिनिधी मतदारसंघातून सहा महिला उमेदवार रिंगणात आहेत.
यामध्ये संध्या इजगुडे, सुप्रिया कोळेकर, मंगल झगडे, संध्या देवकर, नर्मदा पवार, रूपाली वाबळे व कृषी पतसंस्था इतर मागास प्रवर्ग या मतदारसंघातून तुषार जाधव देविदास भोंग या दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
कृषी पतसंस्था विमुक्त जाती भटक्या जमाती या मतदारसंघातून, तीन उमेदवार उभे राहिले आहेत. यामध्ये शिवाजी इजगुडे, बाळासाहेब चितळकर,आबा देवकाते, व ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून सहा उमेदवार रिंगणात आहेत.
यामध्ये संतोष गायकवाड, सुभाष गायकवाड, उल्हासराव जाचक, धोंडीबा थोरात, मधुकर भरणे, तानाजी भोंग, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून तानाजी नरोटे अनिल बागल या दोहांमध्ये सामना रंगणार आहे.
बिनविरोध नाही-
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितरित्या निवडणुकीमध्ये एकत्र आल्यामुळे, पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होईल असे बोलले जात होते. मात्र अवघ्या चार जागा बिनविरोध झाल्या. मात्र इतर 14 जागांसाठी दोन पॅनल उभे राहिले असल्यामुळे अखेर बाजार समिती बिनविरोध झाली नाही.