सातारा – मूळची सातारची असलेली आणि आपले शिक्षण अलिबागसह मुंबईत पूर्ण केलेल्या मधुश्री वारुंजीकर-नाथ हिने मरिन बायॉलॉजीमध्ये नॉर्वेतील विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे. यासाठी तिला युरोपियन युनियनची स्कॉलरशिप मिळाली होती. सेवानिवृत्त मत्स्य विकास आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांची ती कन्या आहे.
मधुश्रीने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबई मधे बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉरमॅटिक्समध्ये बॅचलर्सची पदवी घेतली. त्यानंतर तिने इरास्मस मुंडस मास्टरची शिष्यवृत्ती मिळाली. इरास्मस मुंडस युरोपियन मास्टर्स इन मरीन एन्व्हायर्नमेंट अँड रिसोर्सेस यांनी सप्टेंबर 2019 मध्ये फ्रान्समधील बोर्डो युनिव्हर्सिटी, इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टन, बेल्जियममधील युनिव्हर्सिटी ऑफ लीज आणि स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ बास्क कंट्री यांच्यासमवेत संयुक्तपणे पदव्युत्तर पदवी (एमएस) प्राप्त केली. याप्रमाणे फ्रान्स, बेल्जियम, स्पेन, आइसलॅंड या देशात प्रत्येकी सहा महिने याप्रमाणे मास्टर्स डिग्री पूर्ण केली.
डॉ. जोसेफ डी. रेसिंजर, डॉ. काई क्रिस्टोफर लाय आणि प्रोफेसर ऍनी-कॅटरीन लुंडेबाय यांच्या देखरेखीखाली नॉर्वेच्या बर्गनमधील मरीन टॉक्सिकोलॉजी संशोधन गटातील मरीन रिसर्च इन्स्टिट्यूट बर्गन, नॉर्वे येथे डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली. मधुश्रीने मास स्पेक्ट्रोमेट्री आणि प्रोटिओमिक्स आणि शाश्वत अन्न उत्पादनासोबत काम केले आहे, ज्याचा तिला इरास्मस मुंडस मधील संबंधित अनुभव आहे.
या यशाबद्दल मधुश्रीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.