मुंबई – शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आणि पठाणने जगभर धुमाकूळ घातला. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला आहे.यादरम्यान अनेक छोटे मोठे चित्रपट येऊन गेले मात्र पठाण अजूनही थिएटरमध्ये आहे. ‘पठाण’ने चार दिवसांत 300 कोटींचा आकडा गाठला. अशा परिस्थितीत एका महिन्याच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने छप्परफाड कामे केली आहे.
‘पठाण’ नंतर शेहजादा, अँट मॅन आणि द वास्प: क्वांटुमनिया तसेच सेल्फी असे अनेक दमदार चित्रपट आहेत. असं असूनही कमाईच्या बाबतीत पठाणची गाडी सुसाट चालली आहे. आतापर्यंत पठाणने वर्ल्ड वाईड तब्बल 1000 कोटींचा गल्ला पार केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच आवडल्यामुळे बॉक्स ऑफिसवर पठाणचा जलवा पाहायला मिळतोय. ‘पठाण’ने चौथ्या आठवड्यात जवळपास 13.95 कोटींची कमाई केली असून हा आठवडा खूप चांगला गेला आहे. त्याच वेळी, शुक्रवारी चित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर 27.08 कोटींची कमाई केली.
#Pathaan celebrations continue, with all your love! ❤️
Book your tickets for #Pathaan NOW – https://t.co/SD17p6x9HI | https://t.co/VkhFng6vBjCelebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you, in Hindi, Tamil and Telugu. pic.twitter.com/qOdyfRcW3H
— Yash Raj Films (@yrf) February 24, 2023
‘पठाण’ चित्रपटाला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातून प्रचंड प्रेम मिळत आहे.यशराज प्रॉडक्शनने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. पठाण हा हिंदी चित्रपटातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. भारतातील चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 629 कोटी आहे, त्यापैकी निव्वळ कलेक्शन 520.16 कोटी आहे. परदेशातील चित्रपटांचे कलेक्शन 380 कोटी आहे.एकूण कमाईबाबत बोलायचे झाले तर पठाणने 30 दिवसांत जगभरात 1009 कोटींची गल्ला कमावला आहे.