पिंपरी, दि. 24 चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांना मारहाण झाली असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची दखल घेत, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भोसले यांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी त्यांच्यामसवेत सचिन अहिर, ऍड. गौतम चाबुकस्वार व इतर पदाधिाकरी उपस्थित होते.
चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराची वेळ शुक्रवारी (दि.24) सायंकाळी संपली. या प्रचारादरम्यान बुधवारी (दि. 22) भोसले व अन्य एका राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवीगाळ व बाबचाबाची जाली होती. यावेळी मारहाण झाल्याने भोसले यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच त्यांची फोनवरून चौकशी करत, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला.