मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांना कर्ज घोटाळा प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना सीबीआयने २६ डिसेंबर २०२२ रोजी कथित कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केली होती.
विशेष सीबीआय न्यायालयाने ५ जानेवारी रोजी त्यांची याचिका फेटाळल्यानंतर धूत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. धूत यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता आणि अंतरिम सुटकेची मागणी केली होती.
Bombay HC grants bail to videocon chairman in ICICI loan fraud case
Read @ANI Story | https://t.co/VPd7oKptFL
#BombayHC #VideoconChairmanICICIloanfraudcase pic.twitter.com/2tpQwfM8iB— ANI Digital (@ani_digital) January 20, 2023
धूत यांचे वकील संदीप लड्ढा यांनी मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता की, धूत तपासात सहकार्य करत असल्याने त्यांची अटक अवाजवी आहे. मात्र, वेणूगोपाल धूत तपासात टाळाटाळ करत असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने केला होता.
धूत यांनी आपल्या अटकेबाबत सादर केलेल्या याचिकेत, सीबीआयने आपली अटक “मनमानी, बेकायदेशीर, कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन न करता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम ४१ (ए) चे उल्लंघन आहे. या अटकेसाठी सीबीआयने कोणतीही नोटीस बजावली नसल्याचे म्हटले आहे.